मराठी विनोद...[ Marathi Jokes ]

Laughing Child
Laughing Child (Photo credit: lanchongzi)
​मराठी विनोद...

जनगणने साठी प्रगणक घरी आल्यावर सुरेखाबाईंनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पण
स्वत:चे वय काही केल्या सांगेनात.
तेंव्हा प्रगणक म्हणाला," अहो बाई असे काय करता. तुम्हाला तुमचे वय सांगावेच
लागेल."
सुरेखाबाई," त्या शेजारच्या कावळे बाईनी आपले वय सांगीतले का ?"
प्रगणक," होय."
सुरेखाबाई,"तर लिहून टाका ना तेवढेच."
आणि प्रगणकाने सुरेखाबाईंचे वय लिहीले "कावळ्या ईतके "

गोटया : आई, परी आकाशात उडू शकते?
आई : हो
गोटया : मग आपली रखमा (कामवाली) ... का नाही उडत?
आई : ती परी नाही आहे.
गोटया : पण बाबा तर तीला तू नसताना परी म्हणतात.
आई : काय????? मग आता बघच, उद्या सकाळीच उडून जाईल....

ट्रॅफिक पोलिसांनी कार थांबवली. 'अभिनंदन, रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू  आहे...
तुम्ही सीटबेल्ट लावून गाडी चालवत आहात, म्हणून तुम्हाला ५००० रु.चं बक्षिस मिळतंय.
या रकमेचं तुम्ही काय कराल?'
कार ड्रायव्हर: मी त्यातून माझं ड्रायव्हिंग लायसन्स बनवून घेईन.
ड्रायव्हरची आई (मागच्या सीटवरून): त्याचं काही एक ऐकू नका.. दारू पिऊन तो काय वाट्टेल ते बोलतो...
ड्रायव्हरचे बाबा: मला वाटलंच होतं... चोरीच्या गाडीतून आपण जास्त लांब जाऊ शकणार नाही...
तेवढ्यात डिकीतून आवाज आला: भाई, आपण बॉर्डर पार केली का???

हवालदार : बाई, तुमची कमाल आहे. न घाबरता तुम्ही त्या चोराच्या मुस्कटात मारलीत.!!!!!........
बाई : तो चोर आहे, हे मला नंतर कळ्लं, मला वाटलं आमचे हेच आहेत..

८००० रुपये टेलिफोन बिल आल्यामुळे बबन वैतागला होता, मी माझ्या ऑफिसचा
फोन वापरतो मग एवढं बिल कस?
बायको : मी पण माझ्या ऑफिसचा फोन वापरते. मी
कशाला घराचा फोन वापरू.
मुलगा : मला तर ऑफिसने सेलफोन दिलाय. मी कशाला
घराचा फोन वापरू.
कामवाली : म्हणजे आपण सगळेच कामावरचे फोन वापरतो, मग
एवढं बिल कस?

Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

आयुष्य जास्त सुंदर वाटत....!! [ Marathi Kavita ]

Beautiful Spring Flowers
Beautiful Spring Flowers (Photo credit: www.ForestWander.com)
"चांगली वस्तु",
"चांगली व्यक्ती" व
"चांगले दिवस"
यांची किंमत" निघुन गेल्यावर समजते...
"प्रेमाने" जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे "वैभव"
ज्याच्याजवळ आहे...
तोच खरा "श्रीमंत".

चार चौघात बसण्यापेक्षा,
कधी कधी समुद्र किनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..
आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत.

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत....!!

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार...

International CityStar 肉 Delivery Truck
International CityStar 肉 Delivery Truck (Photo credit: Ricecracker.)
ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार...

1) योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये..

2) वाट पाहिन पण एस टी नेच जाईन.

3) नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा.

4) घर कब आओगे?

5) १ १३ ६ रा

6) सायकल सोडून बोला

7) हॉर्न . ओके. प्लीज

8) "भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे"

9) एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून)

10) तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं

11) माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा

12) राजू, चिंटू , सोनू ....!
       अणि खाली लिहले होते .....
       बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !

13) एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: "मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल"
        खाली लिहिले होते....
     "ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)

Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

ह्या जगात खरच प्रेम असते का...[ Marathi Kavita ]

Mimosa pudica: Flowers
Mimosa pudica: Flowers (Photo credit: Wikipedia)
ह्या जगात खरच प्रेम असते का...
कधी कोण कोणासाठी झुरत का?
मग का तुटतात अचानक नाती.
मग का होतात मने वेगवेगळी

प्रेमाच्या नात्याला तितके महत्व नसते का?
कधी इज्जतीची पर्वा न करता,
घर सोडून पळतात.
कधी इज्जतीची पर्वा करत,
प्रेमाचा बळी देतात.
प्रेम हेच सर्व शिकवते का?

कधी प्रेम नाही मिळालं तर स्वतः मरतात.
कधी आपल्या प्रेमावर acid फेकतात.
प्रेम इतके निष्टुर असते का?
असे खुप प्रश्न आहेत त्याची उत्तरे नाहीत.
ह्या प्रश्नांची उत्तरे कधी काही असतील का?
ह्या जगात खरच प्रेम असते का...

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

यमराज पूजन [Yamraj Pujan]

यम दीपदान
धनत्रयोदशीच्या संध्याकाळी एखाद्या पात्रात तिळाच्या तेलाने भरलेला दिवा लावतात गंध, पुष्‍प आणि अक्षतांनी पूजा करून त्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून यमासाठी खालील प्रार्थना करतात. 


'मृत्यना दंडपाशाभ्याम् कालेन श्यामया सह। त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यज प्रयतां मम।' 
त्यानंतर ते सर्व दिवे इतरत्र लावतात त्यापैकी एक दिवा दाराच्या उंबरठ्यावर अखंड तेवत ठेवतात . अशा प्रकारे दीपदान केल्यावर यमाचा पाश आणि नरकातून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. 


यमराज पूजनया दिवशी यमासाठी एक पिठाचा दिवा बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावाव्या. घरातील स्त्रियानी रात्री दिव्यात तेल टाकून चार बत्त्या लावाव्या पाणी, पोळी, तांदूळ, गुळ, फूल, नैवेद्यासह दिवा लावून यम देवाची पूजा करावी. यालाच यमराज पूजन म्हणतात.


ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

गब्बरचे चरित्र [Gabbar Singh]


भारतातील महान व्यक्तीपैकी एक म्हणजे गब्बर सिंग होय. पण

चरित्रकरांनी त्यांच्यावर नेहमीच अन्याय केला आहे.
गब्बर यांचे प्रेरणादायी जीवन लोकांना कळावे म्हणून गब्बरचे
हे चरित्र लिहिले आहे.

साधे जीवन व उच्च विचार : गब्बर सिंग खूपच साधे सरळ आयुष्य
जगत होता. जुने आणि मळलेले कपडे, वाढलेली दाढी, तब्बल वर्ष
वर्ष न घासलेले दात, आणि डोंगर दऱ्यातील भटके आयुष्य. जसे
काय मध्यकालीन भारतातला फकीरच. त्याने आपले जीवन
आपल्या ध्येय्यासाठी समर्पित केले होते. त्यामुळे
त्याला ऐशो आराम,विलासिक जीवन जगण्यासाठी वेळच
नाही मिळाला. आणि विचारांच्या परिपक्वते बद्दल काय
सांगावे, ‘जो डर गया, सो मर गया’
या सारख्या संवादांनी त्याने जीवनातल्या क्षणभंगुरतेवर
प्रकाश टाकला आहे.

गब्बरची दयाळू प्रवृत्ती : ठाकूरने
गब्बरला आपल्या हातांनी पकडले होते.
यामुळेच त्याने ठाकूरचे फक्त दोन हातच कापले.
तो त्याचा गळा हि कापु शकला असता, पण
त्याच्या ममतापूर्ण आणि करुणामय हृदयाने त्याला असे करू
दिले नाही.

नृत्य आणि संगीताचा चाहता : ‘मेहबूबा ओ मेहबूबा’
यां गाण्याच्या वेळेस त्याच्या कलाकार हृदयाचा परिचय
मिळतो.
अन्य डाकुंसारखे त्याचे हृदय शुष्क नव्हते.
तो जीवनात नृत्य-संगीत यां कलेंच महत्व जाणून होता.
बसंतीला पकडल्या नंतर त्याच्यातला नृत्य प्रेमी खळबळून
जागा झाला होता.
त्याने बसंतीच्या आत दडलेल्या नर्तकीला ओळखल होत.
तो कलेच्या प्रती आपले प्रेम अभिव्यक्त करण्याचे
कोणतेही कारण सोडत नसे.

अनुशासन प्रिय गब्बर : जेव्हा कालिया आणि त्याचे मित्र
आपल्यावर सोपविलेली कामगिरी पार न पडताच वापस आले
होते, तेव्हा त्याने त्याकडे दुर्लक्ष केले नाही.
आपल्या अनुशासन प्रिय स्वभावाला साजेस वर्तन त्याने केल.
आणि त्या तिन्ही जणांना शासन केले.

हास्य प्रेमी : त्याच्याकडे कमालीचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’
होता.
कालिया आणि त्याचे दोन मित्र
यांना मारण्याच्या पहिले त्याने त्यांना खूप हसविले होते.
कारण हसता हसता या जगाचा त्यांनी निरोप घ्यावा असे
त्याला मना पासून वाटत होते.
तो आधुनिक युगातला ‘लाफिंग बुढ्ढा’ होता.

नारीच्या प्रती संम्मान : बसंती सारख्या सुंदर
मुलीला पकडल्या नंतर त्याने तिच्याकडे फक्त
एका नृत्याची विनंती केली.
आत्ताचा डाकू असता तर त्याने कदाचित वेगळंच
काही तरी मागितल असत.

भिक्षुकी जीवन : त्याने हिंदू धर्म आणि महात्मा बुध्द
यांनी दाखविलेला भिक्षुकी मार्ग स्वीकारला होता.
रामपूर आणि इतर गावामधून त्याला जे काही मिळत त्यानेच
तो आपले भगवत होता.
सोने, चांदी, चिकन बिर्याणी, मलाई, पनीर टिक्का इ.
भोगविलासी वस्तूंसाठी तो कधी शहराकडे नाही गेला.

सामाजिक कार्य : एकीकडे आपला डाकू पेशा संभाळत
असताना तो लहान मुलांना झोपविण्याचे काम हि करत
होता.
शेकडो माता त्याचे नाव घेऊन आपल्या उनाड मुलांना झोपवत
असत.
सरकारने त्याच्यावर ५०,००० रुयांचे बक्षीस जाहीर केले होते.
त्या काळात ‘कोन बनेगा करोडपती’ नसल्याने
लोकांना रातोरात श्रीमंत
बनविण्याचा गब्बरचा हा प्रामाणिक प्रयत्न होता..
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

दिवाळी शुभेच्छा – [Happy Diwali - Marathi Greetings]

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी,
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
शुभ दिपावली!

-मराठी ग्रीटिंग्स

आठवण [ Marathi Kavita ]

Orange sunset
Orange sunset (Photo credit: @Doug88888)
"कुणीतरी आठवण काढतंय,
बाकी काही नाही "

मोबईल वाजण्याआधीच
तो वाजल्यासारखा वाटेल.
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल.
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास.

पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास.
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल
काही नाही.
कुणीतरी आठवण काढतंय,
बाकी काही नाही.

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका.
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता.
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे.
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे.
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल
काही नाही.

"कुणीतरी आठवण काढतंय,
बाकी काही नाही "

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

आता मन करतच नाही...[ Marathi love Poem ]

Flower
Flower (Photo credit: @Doug88888)
आता मन करतच नाही,
तुला पुन्हा पहायला,
तुझ्या मिठीत यायला,
तुझ्या कुशीत शिरुन रडायला....

आता मन करतच नाही,
तुझ्या आठवणीत झुरायला,
तुझी वाट बघायला,
तुझ्या प्रेमात अखंड बुडायला.....

आता मन करतच नाही,
तुला वेड होवून शोधायला,
तुझ्याशी मनसोक्त गप्पा मारायला,
तुला पुन्हा परत बोलवायला....

आता मन करतच नाही,
तुझी सोबत मागायला,
तुझ्यात एकरुप व्हायला,
मला तुझ्या डोळ्यात निहाळायला....

आता मन करतच नाही,
तुझ्या स्वप्नात रमायला,
तुझ्या काँलची वेटीँग करायला,
तुझ्याशी मेसेज चँटवर बोलायला.....

आता मन करतच नाही,
मी तुझाच आहे म्हणायला,
तुला माझ्यात समवायला,
तुझ्या ह्रदयात रहायला...

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

आयुष्य हे चहाच्या कप सारखे असतं..[ Life is like a cup of Tea]

Cup of tea
Cup of tea (Photo credit: flash.pro)
आयुष्य हे चहाच्या कप सारखे असतं..
चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेले असतात.
अवती भोवती पाहता हळूच
चहाचा घुटका घेताना तुमच्या लक्षात येते,,
अरेच्या! साखरच
घालायला विसरलो कि काय... ...

पुन्हा जाऊन साखर घालायचा कंटाळा आलेले
तुम्ही कसाबसा तो कडू चहा संपवता आणि नजरेस पडते ती, कपाच्या तळाशी बसलेली न
विरघळलेली साखर....
आयुष्य असच असतं...
सुखाचे क्षण तुमच्या अवती भोवतीच असतात,
त्यांच्याकडे जरा डोळसपणे बघायला शिकले पाहिजे...

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

प्रेम कविता [ Marathi Prem Kavita]

roses
roses (Photo credit: Robert Couse-Baker)
रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं..

...हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम असतं..

गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं
पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं..

तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं..

तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं .

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

बायको असावी तर अशी...

Uproarious laughter
Uproarious laughter (Photo credit: quinn.anya)
बायको असावी तर अशी...

पोलीस- (कार चालवणाऱ्या ला थांबवून) ‘काय राव. भर चौकातून सिग्नल तोडून चाललाय?’
तो- छे हो! सिग्नल पिवळा होत असतानाच पुढे गेलो..
त्याची पत्नी- (बाजूला बसलेली) काहीतरीच काय? चांगला लाल झालेला..
त्यानं पत्नीकडं रागानं बघितलं.
पोलीस- तुमचा मागचा इंडिकेटरपण फुटलाय.
तो- अरेच्या मला माहीतच नव्हतं ते.
पत्नी- अरे, तूच तर सांगितलंस ना मला तोफुटून आठवडा झाला. पण दुरुस्तीला वेळच मिळाला नाही म्हणून!
त्यानं पुन्हा तिच्याकडे दात-ओठ खाऊन बघितलं.
पोलीस- साहेब आणि तुमचा सीट बेल्टपण लावलेला नाहीये.
तो- आत्ताच तर तुम्ही कार थांबवतांना काढला मी तो.
पत्नी- मी तर तुला कधीच सीट बेल्ट लावलेला पाहिला नाही.
तो- पत्नीकडेखाऊ की गिळू नजरेनं पाहून) बाई गं, तुझं थोबाड बंद ठेव.
पोलीस- (तिला) मॅडम, तुमचे मिस्टर असंच बोलतात नेहमी तुमच्याशी?
पत्नी- नाही हो, दारूच्या नशेत असला तरच.

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

पु.लं. चे काही किस्से ...[ stories of Pu. La. Deshpande ]

Laughter is the language of the soul
Laughter is the language of the soul (Photo credit: symphony of love)
पु.लं. चे काही किस्से ...

१) पु.लं. चा वाढदिवस होता, एका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला. पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले.
हे बघुन व्यापारी म्हणाला "काय राव, काय झाले येवढे"?
पु.लं. म्हणाले, "बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही"
घरात हशा पिकला होता !

२) एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यानां कोणीतरी भेटला,
तो त्याचां चाहता होता. तो म्हणाला की
माझी फक्त दोन व्यक्ती वर श्रद्धा आहे, एक ञानेश्वर आणी दुसरे तुम्ही.
माझ्या खोलीत मी ञानेश्वरा च्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय.
तर पु.लं. म्हणाले "अहो असं काही करु नका नहीतर लोक विचारतील, ञानेश्वरानी
ज्याच्या कडुन वेद म्हणुन घेतले तो रेडा हाच का म्हणुन?"

३) पुलं एकदा चितळ्यांच्या दुकानात गेले, मिठाई खरेदी केली आणि खोक्यात बांधून
द्यायला सांगीतले. दुकानातील व्यक्ती म्हणाली "खोक्याचा चार्ज पडेल". त्यावर
पुलं म्हणाले (म्हणे), "अरे वा, म्हणजे मिठाई फुकट?"

४) एकदा पु.ल. एक खेड्यात उतरले होते. तिकडच्या शाळेच्या प्रिन्सिपलनी त्यांना
शाळेत बोलावून त्यांचा सत्कार केला. पुलंनी दिलेल्या खुर्चीवर बसतच त्या
खुर्चीचा हात मोडला. सगळी पोरं खो खो हसायला लागली.
ओशाळलेले प्रिन्सिपल पुलना म्हणाले, "माफ करा पण हजारवेळा सांगूनही इकडच्या
सुतारांकडून नीट कामच होत नाही."
पुल मिश्किलीत म्हणाले, "अहो करवत (!) नसेल"

५) डो. श्रीरंग आडारकर यांचे चिंरजीव अशोक यांना त्याच्या विवाहनिमित्त पु.लनी
पाठविलेले पत्र.
"आजचा दिवस तुझ्या कोमल आयुष्याचा महत्त्वाचा.सुमारे चौतीस वर्षापूर्वी, जून
महिन्यातच असाच एक महत्त्वाचा दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीतामावशीच्या
आयुष्यात आला होता."

६) स्वत:च्या खास विनोदी पध्द्तीत पु.ल.एके ठिकाणी म्हणतात," मुलगी अगर मुलगा सरळ
वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार
? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी व्याख्या आहे"

७) आपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या तथाकथित सवयीमुळे पु.ल. एकदा आपल्या
पत्नीला-सुनीताईंना -म्हणाले," या घरात मी तेवढा देशपांडे आहे.तू
’उपदेश-पांडे’ आहेस."

८) भारती मंगेशकर ह्या दामु अण्णा मालवणकर ह्या प्रसीध्द्य विनोदी कलाकाराची
कन्या.त्या दिसायला अतिशय सुरेख होत्या आणी दामू अण्णा तसे दिसायला खास
नव्हते!त्यामुळे पु.लं. नी जेव्हा तीला पाहिले तेव्हा म्हणाले " हि मुलगी
बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!"

९) पु.लं.च्या एका सभेला अत्रे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, पु.ल.
थोर साहित्यीक आहेत, त्यांनी खुप साहित्य नीर्मीती केली आहे. नंतर त्यांच्या
कडें बघत ते पुढे म्हणाले सहाजिक आहे, त्यांच्या नांवात पु आणि ल दोन्ही
आहे,मग निर्मीतिस काय कमी?

१०) पुलं एका समारंभाला जाण्यासाठी तयार होत असताना म्हणाले," मी कुठल्याही
समारंभाला 'बो'लावल्याशिवाय जात नाही.

११) एकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते
म्हणाले," आता मला कळले,पायांना पाव का म्हणतात ते!"

१२) पुण्यात भानुविलास नावाचे चित्रपटगृह होते. तर सुरुवातीला त्याला पत्र्याचे
छप्पर होते. आणि त्याच्या छतातून
उन्हाचे कवडसे पडत असत. एकदा पु.ल.(?) तिथे गेले होते आणि ते कवडसे पाहून
म्हणाले "अगदी
बरोबर नाव ठेवले आहे, भानुविलास!"

१३) 'वाऱ्यावरची वरात'चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या दिवशी
बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने निघाले. विंगेत
उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले... 'प्रयोग संपेपर्यंत
थांब!' लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला.
लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले,
'उद्या याची 'वरात' निघणार आहे, पण तो आजच 'वाऱ्यावर' स्वार होऊन आला
आहे'...आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

१४) पुणे आकाशवाणीवर १९५५ मध्ये पु.ल. विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख म्हणून
कार्यरत होते. जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत सगळे निर्माते एकत्र
बसत असे. त्यांत पु.ल., कविवर्य बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी
असायची. त्यावेळचा एक प्रसंग .
महात्मा गाधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा २ ऑक्टोबरचे कार्यक्रम
ठरवण्यासाठी केंद्र्संचालकानी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या. कुणी
काही कुणी काही कार्यक्रम सुचवले पु.ल. म्हणाले "गांधाजींना मौन प्रिय होते.
तेव्हा आपण २ ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू नये." यावर
संचालकांसह सर्व जण खळखळून हसले.

१५) एकदा एक 'कदम' नावाचे गृहस्थ पु लं कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन आले.....पु
लं नि आशीर्वाद दिला .......
'कदम कदम बढाये जा'

१६) सुनीताबाईंसह वसंतराव देशपांडे आणि पुलंचा गाडीतून प्रवास सुरू असताना जेव्हा
समोर एक मोठा गवा आक्रमक भूमिकेत येतो आणि वसंतराव सुनीताबाईंना इंग्रजीत काही
तरी सूचना करतात, हे ऐकून "पुलं' म्हणतात, "त्या गव्याला इंग्रजी समजत नाही
म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलतात।'

१७) एका सगींत संमेलनाच्या भाषणात पु.ल. नी एक किस्सा सांगितला होता.
’एकदा एका शेताच्या बांधावरुन जात असताना एक शेतकरी शेतात काहीतरी काम करताना
दिसला. आम्हा लेखकांना कुठे गप्पा केल्याशीवाय राहवत नाही. त्या स्वभावानुसार
मी त्या शेतकराला विचारलं "काय हो शेतकरी बुवा, या झाडाला कोणते खत घातले तर
त्याला चांगले टॉमेटो येतील?" त्यावर तो शेतकरी चटकन म्हणाला "या झाडाला
माझ्या हाडांचे खत जरी घातलेत तरी त्याला टॉमेटो कधीच येणार नाहीत कारण ते झाड
वांग्याचे आहे."

Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

मराठी विनोद [ Marathi Jokes ]

Laughter is the magical impulse of life
Laughter is the magical impulse of life (Photo credit: symphony of love)
1) भिमाकाकू सिनेमा हॉल मधे पेप्सीची बाटली घेवुन गेल्या होत्या, थोड्या थोड्या
वेळाने घोट घेत होत्या,आवाज येत होता, त्यामुळे शेजारी बसलेल्या माणसाला राग
आला. त्याने बाटली हिसकावून घेतली आणि एका घोटात सगळी बाटली संपवली
माणूस : अस पितात कोल्डड्रिंक ..
भिमाकाकू : अरे बाळा पण मी कोल्डड्रिंक पीत नव्हते, पान खाऊन त्या बाटलीमधे
थ.कत होते.

2) दारू मुले आयुष्य उध्वस्त झालेल्या बेवड्याला बियर च्या बाटल्यांचा खच दिसला..
१ बाटली फोडून तो म्हणाला, तुज्यामुळे माझी बायको मला सोडून गेली...
२ बाटली फोडून तो म्हणाला, तुज्यामुळे माझा जॉब गेला...
३ री बाटली फोडण्यासाठी उचलली ती भरलेली होती, ती पिशवीत ठेवत तो म्हणाला,
तुझा काही दोष नाही, तू चल घरी...!

3) व्हॅक्युम क्लिनर सेल्समनचा जॉब लागल्यापासून संता उत्साहात होता,
भिमाकाकुंच्या घरात शिरला आणि ती काही बोलण्याच्या आतच खिशातुन एक पिशवी काढुन
त्यातले शेण जमिनीवर टाकल आणि म्हणाला : मॅडम ह्या व्हॅक्युम क्लिनरने हे
जमिनीवरचे शेण ५ मिनीटात साफ होईल नाही तर मी स्वत: ते खाऊन टाकेन.
भिमाकाकुं (उत्साहात) : तु ते शेण पावाबरोबर खाणार की चपातीबरोबर?
संता (दचकून) : का ?
भिमाकाकुं : कारण आता लाईट गेले आहेत..

4) एक कवी कविता ऐकवित होता. पण तो जसा कविता सांगायला सुरवात करीत असे त्याच्या
तोंडातली कवळी बाहेर यायची. असं बराच वेळ चालत राहालं.
शेवटी कंटाळून एक श्रोता म्हणाला, '' ओ महाशय काही कविता सांगता की नुसती
कॅसेटच बदलत राहाता.''

5) शाळेत मराठीचा क्लास चालू होता.
बाई : हे बघा मुलांनो , मराठी मध्ये प्रत्येक वाक्याचे २ अर्थ काढता येतात!!
दिघ्या : बाई काढून दाखवा ना !!!!!
बाई ( लाजुन ) : खाली बस वेडया ! तुझ्या या वाक्याचे देखील २ अर्थ निघतात!

6) Income tax officer हसत होता..
क्लार्क : काय झाल साहेब?
ऑफिसर : मल्लिका शेरावत ची फाईल आहे..
क्लार्क : मग? त्यात हसण्यासारख काय आहे?
ऑफिसर : कपडे तर घालत नाही आणि laundry bill दाखवलय ८ लाखाच..

7) पती : आपल्या बिल्डींग मधला राजू काय काय बडबडत होता..
पत्नी : काय म्हणत होता ?
पती : तो म्हणत होता. आपल्या बिल्डींगमधील एक बाई सोडून सगळ्या बायकांशी त्याच
लफड आहे म्हणून. कोण असेल ती एक बाई ?
पत्नी : देशपांडे आजी असतील.

8) कॉलेजचा पहिला दिवस, कॉलेजच्या कट्ट्यावरील काही टपोरी मुले चिंगीला अडवतात.
पहीला मुलगा : काय ग तुजे नाव काय आहे?
चिंगी : मला सर्वजण ताई बोलतात.
दुसरा मुलगा : कमाल आहे !!! काय योगा-योग आहे .. मला सर्वजण भाऊजी बोलतात...


Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

चुकून चुकून [ Marathi Poem ]

Beautiful Eyes
Beautiful Eyes (Photo credit: BabyEksy)
चुकून चुकून कधींतरी डोळ्यांना डोळे
भेटले असतील, नसतील.

चुकून-चुकून कधींतरी चार शब्द
दिले घेतले असतील, नसतील …

शुकून-चुकूनमधले अचूक उभें करणारे-
असतील-नसतील मधल्या क्षणांचे स्पंदन
स्थिर करणारें..

एकामागून एक कवचें निघळून मनासारख्या
नितळ संगमरवराचें घडलेलें तें शिल्प …

त्याचें अस्तित्व हेंच सर्वस्व. जोखीम जपून ठेवायची.
त्याचें दर्शन हीच शिक्षा. मुकेपणानें सोसायची.

-’ गर्भरेशीम ‘ इंदिरा संत

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

नवरात्र शुभेच्छा [Navratri - Marathi Greetings]


उदो बोला उदो, अंबाबाई माऊलीचा हो ।
उदो कारे गर्जती, काय महिमा वर्णू तिचा हो ।
उदो बोला उदो ॥ धृ॥

अश्विन शुद्ध पक्षी, अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासून, घटस्थापना ती करूनी हो ।
मूलमंत्रजप करूनी, भोवते रक्षक ठेवोनी हो । ब्रम्हा विष्णू रूद्र, आईचे पूजन करती हो ॥१॥
उदो बोला उदो ….॥धृ॥

द्वितीयेचे दिवशी, मिळती चौसष्ट योगिनी हो । सकळांमध्ये श्रेष्ठ, परशुरामाची जननी हो ।
कस्तुरी मळवट, भांगी शेंदूर भरूनी हो । उदो कारे गर्जती, सकळ चामुंडा मिळुनी हो ॥२॥
उदो बोला उदो……. ॥ धृ ॥

तृतीयेचे दिवशी, अंबे श्रृंगार मांडिला हो । मळवट पातळ चोळी, कंठी हार मुक्ताफळा हो ।
कंठीचे पदके कासे, पितांबर पिवळा हो । अष्टभुजा मिरविती, अंबे सुंदर दिसे लीला हो ॥ ३॥
उदो बोला उदो ……. ॥धृ॥

चतुर्थीचे दिवशी, विश्वव्यापक जननी हो,। उपासका पाहसी, अंबे प्रसन्न अंतकरणी हो ।
पूर्णकृपे तारिसी, जगन्माते मनमोहिनी हो । भक्तांच्या माऊली, सुर ते येती लोटांगणी हो ।।४॥
उदो बोला उदो अंबाबाई…… ॥धृ॥

पंचमीचे दिवशी, व्रत ते उपांगललिता हो । अर्घ्य पाद्य पूजने, तुजला भवानी स्तविती हो ।
रात्रीचे समयी, करिती जागरण, हरिकथा हो । आनंदे प्रेम ते, आले सद्भावे क्रीडता हो ।।५॥
उदो बोला उदो……. ॥धृ॥

षष्ठीचे दिवशी, भक्ता आनंद वर्तला हो । घेऊनी दिवट्या हस्ती, हर्षे गोंधळ घातला हो ।
कवडी एक अर्पिता, देसी हार मुक्ताफळा हो । जोगवा मागता प्रसन्न झाली भक्तकुळा हो ।।६॥
उदो बोला उदो…… ॥धृ॥

सप्तमीचे दिवशी, सप्तश्रृंग गडावरी हो । तेथे तू नांदसी, भोवती पुष्पे नानापरी हो ।
जाई जुई शेवंती, पूजा रेखीयली बरवी हो । भक्त संकटी पडता, झेलूनी घेसी वरचे वरी हो ।।७॥
उदो बोला उदो……. ॥धृ॥

अष्टमीचे दिवशी, अष्टभुजा नारायणी हो । सह्य्राद्री पर्वती, पाहिली उभी जगत् जननी हो ।
मन माझे मोहीले, शरण आलो तुजलागुनी हो । स्तनपान देऊनी, सुखी केले अंतःकरणी हो ।।८॥
उदो बोला उदो …….॥धृ॥

नवमीचे दिवशी, नव दिवसांचे पारणे हो । सप्तशती जप, होमहवने सद्भक्ती करुनी हो ।
षड्रस अन्ने नैवेद्यासी, अर्पियली भोजनी हो । आचार्य ब्राह्मणा, तृप्त केले कृपेकरुनी हो ।।९॥
उदो बोला उदो……. ॥धृ॥

दशमीचे दिवशी, अंबा निघे सिमोल्लंघनी हो । सिंहारूढ करी दारुण, शस्त्रे अंबे त्वा घेऊनी हो ।
शुंभ निशुंभादिक राक्षसा, किती मारिसी रणी हो । विप्रा रामदासा, आश्रय दिधला तव चरणी हो ।।१०॥
उदो बोला उदो……. ॥धृ॥

आभार - मराठी ग्रिटींग्ज.नेट

ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार...[ marathi suvichar ]

Ashok Leyland Truck
Ashok Leyland Truck (Photo credit: Balaji.B)
ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार...

1) "बघतोस काय ? मुजरा कर .....!"

2) बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!

3) "बघ माझी आठवण येते का ?"

4) ''पाहतेस काय प्रेमात पडशिल''

5) साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.

6) अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही

7) तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'

8) 'अहो, इकडे पण बघा ना...'

9) "हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".

10) थांब लक्षुमी कुंकू लावते!

11) तुमचे लक्ष आमच्याकडे का?

12) "लायनीत घे ना भौ"

13) चिटके तो फटके!

14) राजे तुम्हि पुन्हा जन्माला या

15) १३ १३ १३ सुरूर !

16) "नाद खुळा"

17) "हाय हे असं हाय बग"

18) आई तुझा आशिर्वाद.

19) "सासरेबुवांची कृपा "

20) "आबा कावत्यात!"

21) पाहा पन प्रेमाणे

22) नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.

23) "हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!"

24) अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.

25) हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी...

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

मोबाइलची काय काळजी घ्यायची ? [ How to take care of your Mobile? ]

Mobile Computing
Mobile Computing (Photo credit: mobilyazilar)
मोबाइलची काय काळजी घ्यायची ?

तातडीने कोणाला तरी अत्यंत महत्त्वाचा निरोप द्यायचा आहे आणि नेमका मोबाइल
बंद पडतो . बटणं डायल होत नाहीत , स्क्रीन निकामी होते किंवा आवाजच यायचा बंद
होतो . वारंवार असं घडायला लागलं की आपण थेट मोबाइल बदलण्याच्या निर्णयापर्यंत
येतो . पुन्हा आपण नवीन मोबाइलची काळजी न घेतल्याने घटनेची पुनरावृत्ती होते .
याला हॅण्डसेट नाही तर आपण जबाबदार असतो हे लक्षात घ्यायला हवं .

आपल्याकडील ऋतुमानानुसार मोबाइलचे आजारही बदलत असतात . उन्हाळ्यात बहुतांश वेळा
मोबाइलची बॅटरी निकामी होण्याचे प्रकार घडतात . तर पावसाळ्यात डिस्प्ले बिघडतो.
हिवाळा आपल्या आरोग्याप्रमाणोच मोबाइलच्या आरोग्यासही फारसा त्रास देत नाही .
आपल्या मोबाइलची काळजी घेणं ही अतिशय सोपी बाब आहे . त्यासाठी आपल्याला काही
खास वेळ बाजूला काढण्याची गरज भासत नाही . फक्त काही गोष्टींची गरज पूर्ण करणं
गरजेचं असतं .

पाणी आणि मोबाइल :
पाणी आणि मोबाइल या परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत , ही बाब मनावर चांगली ठसवून
घ्या . मोबाइलमध्ये चुकूनही पाणी जाऊ देऊ नका . विशेषत : पावसाळ्यात आपल्याला
ही गोष्ट जपावी लागते . यासाठी पावसाळ्यात प्लास्टिकच्या कव्हरमध्ये जरी आपण
मोबाइल ठेवला तरी तो सुरक्षित राहू शकतो . पाणी पितानाही मोबाइल लांब ठेवावा .
नंबर डायल करताना किंवा मोबाइल हाताळताना हात कोरडे असल्याची खात्री करून घ्या.
तसंच , मोबाइल वाळू पासूनही सुरक्षित ठेवा .

मोबाइल पाडू नका :
तुमचा मोबाइल चुकून किंवा इतर कुठल्याही कारणाने पडू देऊ नका . मोबाइलसारखा
पडल्याने त्याची बॉडी लूज होतात . यानंतर मोबाइल पाडत राहिल्यास बॅटरी आणि बॉडी
वेगवेगळे पडायला लागतात . यामुळे मोबाइलच्या व्हॉइस क्वालिटीवर खूप परिणाम होतो.
आपल्याला ऐकावयास त्रास होता किंवा समोरच्याला आपला आवाज खूप कमी ऐकू जातो .
यामुळे शक्यतो मोबाइल कव्हरचा वापर करावा . जेणे करून मोबाइल पडलाच तर , किमान
त्याचे दोन वेगळे भाग तरी होणार नाहीत .

अति चार्जिंग नको :
मोबाइलची बॅटरी नेहमी फूलच असावा असा अनेकांचा अट्टाहास असतो . यामुळे ते सतत
आपला फोन चार्जिंगला लावून ठेवतात . उन्हाळ्यात याची विशेष काळजी घ्यावी . १२
तासांच्यावर आपला मोबाइल कधीही चार्जिंगला ठेऊ नये . तसंच , तो ७० टक्के
डिस्चार्ज झाल्याशिवाय चार्जिंगला लावणं टाळा . कार चाजर्सपासून विशेषत :
मोबाइल गरम होण्याची शक्यता जास्त असते . यामुळे अगदी आवश्यक असल्यासच कार
चार्जिंगचा वापर करावा . जर फोन अधिक गरम झाला तर , फोनवर येणारे रेडिओ सिग्नल
तसेच त्याचे आवाजात रूपांतर करणारी यंत्रणा निकामी होऊ शकते .

चोरांपासून सावध :
मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला असे आपण वारंवार ऐकत असतो . पण मोबाइल चोरी होऊ
नये म्हणून आपण फारसे कष्टही घेत नाही . तसंच आपला मोबाइल हरवला तर , तो
शोधण्यासाठीही आपण प्रयत्न करत नाही . यासाठी एक छोटी क्लुप्ती आहे . जर
तुमच्याकडे तुमच्या मोबाइलचा आयएमइआय नंबर असेल तर मोबाइल सापडणं सोपं होतं .
मोबाइलमध्ये जर कोणी दुसरे कार्ड घातल्यावर ताबडतोब आपल्याला आपला मोबाइल
कोणत्या भागात आहे हे समजू शकते . आयएमइआय नंबरसाठी जर तुम्ही * टाइप केले की,
नंबर मिळतो . तो आपण आपल्याकडे कुठेतरी नोंद करून ठेवावा .

मोबाइलच्या हृदयाची काळजी :
मोबाइलचे हृदय म्हणजे तुम्हाला कळलेच असेल अर्थात बॅटरी . या बॅटरीशिवाय मोबाइल
वापरणे व्यर्थ आहे . यावेळेस आपल्याला नेटवर्क नसते त्यावेळेस मॅन्युअली
नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न करू नये . तसेच आपण जर एखाद्या ग्रामीण भागात गेलो
असू आणि आपल्याला रेंज येत नसेल तर मोबाइल स्विच्ड ऑफ करून ठेवा . कारण नेटवर्क
शोधण्यासाठी मोबाइलची बॅटरी सर्वाधिक खर्च होत असते . शक्यतो वायब्रेशन बंद
ठेवणं , बॅकलाइटचा वापर टाळणं , ब्लूट्यूथ , वायफाय , इन्फ्रारेड यासारखे
फिचर्स गरज नसताना बंद करणं यामुळे बॅटरी कमी डिस्चार्ज होईल आणि त्याला
चार्जिंग कमी लागेल . यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढेल . बॅटरीला अति चार्जिंग देऊ नका . त्याचबरोबर
बॅटरी पूर्ण संपेपर्यंत शक्यतो चार्जिंग करायचंही थांबू नका . बॅटरीत पाणी जाऊ
देऊ नका , आपल्या मोबाइलची बटणे बिघडली असतील तर ती दुरूस्त करा . कारण अनेकदा
ती बटनं दाबली गेलेली असतात यामुळे बॅटरी न कळतपणे डिस्चार्ज होते .

Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

पावसाळा -काही घरगुती उपचार [ Home Remedies for Rainy season]

rain-flower
rain-flower (Photo credit: geekybodhi)
पावसाळा -काही घरगुती उपचार...

पावसाळा, म्हणजे आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेण्याचा काळ. पावसाळ्यात अग्नी
मंद होत असल्याने पचन खालावते, वात वाढतो, त्यामुळे शरीरशक्‍ती कमी होत असते.
शिवाय पावसाळ्यात जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. या गोष्टी लक्षात
घेता पावसाळा सुरू झाला की त्रास होण्यापूर्वीच काही घरगुती उपचार करणे इष्ट
असते.

गवती चहा, आले, तुळशी, दालचिनी यांच्यासह उकळलेल्या पाण्यात चवीनुसार साखर
टाकून पावसाळ्यात रोज एकदा घेणे चांगले असते. यामुळे जंतुसंसर्ग होण्यास
प्रतबंध होतो व पचनशक्‍ती चांगली राहण्यास मदत मिळते.

ओवा, तीळ, ज्येष्ठमध, सैंधव वगैरे द्रव्यांपासून बनविलेली सुपारीपावसाळ्यात
जेवणानंतर खाणे हितावह असते, याने पचनाला मदत होते.*

पावसाळ्यात पुदिना हे सुद्धा मोठे घरगुती औषध आहे. जेवणात पुदिन्याची ताजी
पाने, काळी द्राक्षे, जिरे, हिंग, सैंधव, मिरी यापासून बनविलेली चटणी खाण्याचा
उपयोग होतो. याने तोंडाला रुची येते, शिवाय पचनास मदत मिळते.

दुपारच्या जेवणानंतर किसलेले आले व पुदिन्याचा रस टाकून ताक घेण्यानेही पचन
व्यवस्थित राहण्यास मदत मिळते. विशेषतः जुलाब, आव वगैरे त्रासांना प्रतबंध होतो.

पावसाळ्यात वातदोष वाढतो. वात वाढला की त्यापाठोपाठ दुखणेआलेच. संधिवात,
आमवात वगैरे दुखणे असणाऱ्यांना याचा अनुभव येतोच. अशा व्यक्‍तींनी व इतरांनीही
पावसाळ्यात सुंठ-गूळ-तूप यापासून बनविलेली लहान सुपारीच्या आकाराची गोळी घेणे
चांगले असते. याने वातदोष नियंत्रित होण्याबरोबर पचनालाही मदत मिळते.

 पावसाळ्यात भूक लागत नसली, पोट जड वाटत असले, गॅसेस अडकून राहिले आहेत असे
वाटत असले तर लिंबू व आल्याच्या रसाच्या मिश्रणात थोडी जिरे पूड व सैंधव टाकून
तयार केलेले चाटण थोडे थोडे चाटणे उत्तम असते.

 हिंग्वाष्टक नावाचे चूर्ण पावसाळ्यात उत्तम होय. त्रास असो वा नसो,
प्रकृतीनुसार पाव ते अर्धा चमचा चूर्ण व थोडेसे तूप भाताच्या पहिल्या घासाबरोबर
घेण्याने भूक लागायला मदत होते, अन्न व्यवस्थित पचते.

 पावसाळ्यात तेल लावून गरम पाण्याने स्नान करणे हितावह असते. वातशामक
द्रव्यांनी सिद्ध केलेले तेल वापरणे अधिक हितावह असते.*

जंत होऊ नयेत व झालेले जंत नष्ट व्हावेत यासाठी उपाययोजना करणे एरवीही
चांगले असते. पावसाळ्यात मात्र याकडे विशेषतः द्यावे लागते. त्यादृष्टीने
महिन्यातून आठ दिवस सकाळी चमचाभर वावडिंगाचे चूर्ण मधासह घेणे चांगले असते.
कढीलिंबाची ताजी पाने वाटून केलेली गोळी अधून मधून घेण्याचाही उपयोग होतो.

 पावसाळ्यात जंतुसंसर्ग होण्याची शक्‍यता सर्वाधिक असते. यास प्रतबंध
होण्याच्या दृष्टीने घर, ऑफिस, दवाखाने वगैरे सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे धूप
करणें उत्तम असते. यासाठी कडुनिंबाची पाने, वावडिंग, कापूर, ऊद वगैरे
द्रव्यांचे मिश्रण वा तयार ‘संतुलन प्युरिफायर धूप’ वापरता येतो.

पावसाळ्यानंतर हिवाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी येणाऱ्या शरद ऋतूत पुन्हा एकदा
पित्त वाढत असते किंबहुना पित्ताचा प्रकोप ह्याच काळात होत असल्याने उन्हाळ्यात
घ्यायची काळजी पुन्हा या दिवसात घेणे आरोग्यरक्षणासाठी चांगले असते.

Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob.9221716915 /9867627235

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

पु.लं. चे काही किस्से..[ STORIES OF PU. LA. DESHPANDE ]

English: My Chillhood
English: My Chillhood (Photo credit: Wikipedia)
 पु.लं. चे काही किस्से....

1) एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली.
बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. "तुमच्या घरी काय, तुम्ही आणी
सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार".

ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले.
"तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते
ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?"

2) पुलंच्या हजरजबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या जातात.
'आनदंवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात विविध
क्षेत्रातली मातब्बर मंडळी सहभागी झाली होती.
समोरच्या पंगतीत 'किर्लोस्कर' मासिकाचे संपादक मुकंदराव किर्लोस्कर बसलेले
होते.
मधुनच ते उठले व तो सुखसोहळा आपल्या केमे-यात बंद करण्याच्या कामात लागले. परत
येऊन पाहतात, तर ह्यांच पान गेलेलं
ह्यांची शोधक नजर पु.ल. लगेच उद,गारले, "मुकुंदराव, इथं संपादकीय पान नाहीये."

3) मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.लं. यांनी सरकारी
कामकाजातील दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले,"रेडिओवरच्या मराठीतीन 'अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल' असं मी
जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मल्ल कळेना! आता कळलं.
'सुत्र' हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही माहीती मिळाली,
असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं असतं? म्हणजे आता
आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती 'मंगळसुत्रा'कडुन कळली, असं
म्हणायला हरकत नाही!"

4) माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका.
एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखात घेत होते. प्रेक्षकांच्या
पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही मुलाखात ऎकत होते.
हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना, त्यांच्या
पतीबद्दल प्रश्न विचारला, "तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती?"
लग्नाला खुप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करीत
होत्या.
ते पाहुन पहिल्या रांगेतील पु.लं. उत्स्फुर्त्पणे मोठ्यानं म्हणाले, "अरे
सुधीर, सारखं सारखं त्यांच्या 'वर्मा'वर नको रे बोट ठेवुस!"

5) कोल्हापूर आणी तेथील एकूणच भाषा व्यवहार म्हणजे पु. ल. च्या मर्मबंधातील ठेव.
कोल्हापूरी समाजाइतकाच कोल्हापूरी भाषेचा बाज सागंताना ते म्हणाले, 'इथे
रंकाळ्याला रक्काळा म्हणतात पण नगर्याच्या नंगारा करतात. कोल्हापूरातलं
इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरी बाहेर येऊन आपल्या छातीवर हात बडवायला लावील
असं आहे. त्यानं शेतात ऊसं लावला' याच इग्रंजी रूपांतर इथल्या मुन्सफानं एकदा
' He applied U'S In his farm असं केलं होतं आणि त्यावेळच्या शुध्दलेखनच्या
नियमाप्रमाणं 'यू' वरती अनुस्वार द्यायलाही तो विसरला नव्हता.

6) एकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पाताळाऎवजी पु.ल. चे
'हसवणूक' हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहीले, 'प्रिय ___हिस, तुझ्या
पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पाताळाऎवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द हेतु फसवणूक
नसून हसवणूक हाच आहे. तुझाच___!' त्यावर ही त्याची पत्नी चिडली. तिने थेटं
पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण पत्रीकेखाली स्वाकक्ष्ररीनिशी
त्याला समजावले, 'आपल्याकडे नवर्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच
व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर!"

7) नवीन शुध्दलेखनाचे नियम जर उच्चारानुसारी केले तर त्यानुसार होणारे शुध्दलेखन
अधिक सुलभ व बिनचूक होईल, असं महामंडाळात घाटत होतं. त्यावर पु.ल. नी खालील
छेद दिला, 'मी नुकताच एका ग्रामीण शाळेत गेलो होतो. तिथं मास्तर मुलांना
शुध्दलेखन घालीत होते. ते म्हणाले, 'पोरांनो लिवा. कयाssssळs!'

8) हिंदुह्र्द्ययसम्राट बाळासाहेब ठाकरे यानां काही कारणास्तव हिंदुजा होस्पिटल
मध्दे दाखल करण्यारत आले होते. ते ऎकताच पु.ल. उध्दारले, 'त्यांच्या खोलीच्या
दरवाज्यावर आता 'गर्वसे कहो हम हिदंजा मे हे' असं लिहालया हरकत नाही.'

9) साहीत्य सघांत कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता. पु.ल. ना
आर्वजुन बोलावले होते. नाटकाचा पहिला अकं चालू असता- नांच पडल्याचा आवाज झाला.
शेजारचा घाबरुन पु.ल. ना म्हणाला, ' काय पडलं हो?' 'नाटक दुसरं काय?' पु.ल.
उत्तरले.

10) कोल्हापुरला एकदा आमच्या नाटकाचा प्रयोग असतांना नाटकात काम करणारी एक मेत्रीण
नुकतीच बाजारात जाऊन आली होती व अगदी रंगात येऊन मला सागंत होती, काय सुदंर
सुदंर कोल्हापुरी साज आहेत गं इथल्या बाजारात., अप्रतीम नमुने आणि सूदंर
कलाकुसर, अनं भरगच्च तर इतके की एक साज घातला गळ्यात की दुसंर काहीच घालायला
नको.' हे ऎकत जवळपास असलेले भाई मीश्कीलपणे हळुच म्हणाले, 'खरं सागंतेस की
काय?' क्षणभराने त्यातली खोच लक्षात आल्यावर ऎत्रिणीचीं लाजुन व आमची हसुन
मुरकुंडी वळली.

11) 'वॆद्यकातली एकच गोष्ट या क्रीकेटमध्ये येऊन चपखल बसली आहे. ती म्हणजे
त्रिफळा. खेळणारांचे येथे चुर्ण व्हावे. गोट साफ.' - इती पु.ल.

12) एकदा वसतंराव देशपांडे पु.लं. ना म्हणाले "हि मुलगी (सुनिताबाई) म्हणजे एक
रत्न आहे'. ह्यावर पु.लं. लगेच म्हणाले 'म्हणुनच गळ्यात बांधुन घेतलय!!

13) एकदा आपली आणी सुनिताबाईंची ओळख करुन देताना पु.लं. म्हणाले की "मी 'देशपांडे'
आणी ह्या 'उपदेशपांडे"

14) एकदा एक भोजन समारंभात पु.लं. च्या एक बाजुला श्रि ना.ग. गोरे आणि दुस-या
बाजुला श्रि भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु.लं. म्हणाले, "आफतच आहे. एकिकडे
नाग आहे तर दुसरीकडे भुजंग! !!"

15) एकदा पु.लं. ना एक कुकरी सेट गिफ्ट म्हणुन मीळाला. तो सेट सुनिता देशपांडे
आपल्या भाचीला दाखवत होत्या.
सुनिताबाईंचा 'सर्व काही जपुन ठेवण्याचा " स्वभाव माहित असल्यामुळे भाची
सुनिताबाईंना म्हणाली
" अगं, एवढा सुदंर सेट फुटु नये या भितीने तु तो कधी वापरणारच नाहीस का?"
त्यावर पु.लं. पटकन म्हणाले "हो तर !! सुनीता मला कधी ओमलेट सुद्धा करुन देत
नाही ... अंडी फुटतील म्हणुन !!!"

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

मराठी विनोद [ Marathi Vinod ]

Best Viewed Large
Best Viewed Large (Photo credit: Wikipedia)
मराठी विनोद.........

मुलगी : तूला माझी आठवण आली कि तू काय करतोस ?
मुलगा : तुझ्या आवडीचे choclate खातो . आणि तूला माझी आठवण आली कि तू काय करतेस?

मुलगी : एक छोटी GOLDFLAKE मारते ...
----------------------------------------------------------

प्रियकर - सुंदर मुली कधीच कोणत्या मुलाच्या मागे धावत नाहीत
प्रेयसी - कशावरून ??
प्रियकर - पिंजरा कधी उंदराच्या मागे धावलेला पहिला आहेस का ??..
----------------------------------------------------------

प्रेयसी : माझ्या राजा, मी उद्या तुला भेटायला नाही येऊ शकत........
प्रियकर : ठीक आहे, मग मी तुला घेतलेलं गीफ्ट कोण दुसर्याला देऊन टाकतो ...
प्रेयसी : सोन्या, माझ्या म्हणण्याचा अर्थ असं होता, की मी उद्या नाही येऊ शकत!
आत्ता कुठे आहेस तू ?...
----------------------------------------------------------

चंचुमल : बाबा...मी आज तुम्हाला अभिमान वाटेल असं काम केलंय.
कवडीमल : हो का...काय केलंस तरी काय?
चुंचूमल : मी दादरपासून वांद्यापर्यंत बसच्या मागे धावत गेलो आणि दहा रुपये
वाचवले चक्क.
कवडीमल : अरे मूर्खा...पण बसच्या ऐवजी जर कूलकॅबच्या मागे धावला असतास तर शंभर
रुपये नसते का वाचले....

Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235

पोटाचा घेरा [ Obesity]

Two mice; the mouse on the left has more fat s...
Two mice; the mouse on the left has more fat stores than the mouse on the right. (Photo credit: Wikipedia)
पोटाचा घेरा वाढला आहे मग हे करा

आजकाल संतुलित आहाराचा बोलबाला आहे याचवेळी अंगावर चरबी वाढण्याची
समस्याही साधारण बाब बनली आहे.आरोग्याची योग्य जाण नसल्याने ही समस्या
गंभीर बनत चाललीय आणि लठ्ठपणाही वाढतोय.

लठ्ठपणामुळे आपल्याला अनेक घातक आजार होऊ शकतात.लठ्ठपणा कमी
करण्यासाठी योगाचा आधार घेणे चांगले. योगशास्त्रातील एक विधी आहे
कपालभाती प्राणायाम. या प्राणायामाने लठ्ठपणावर नियंत्रण मिळविणे
सहजशक्य आहे. तुम्हाला अद्यापही कपालभाती कसे करावे माहित नसेल तर
पुढील विधी पाहा.

चटईवर बसा. बसल्यानंतर पोट सैल सोडा. आता जोरात श्वास बाहेर
सोडा आणि पोटाला हिसका देऊन आत खेचा. श्वास बाहेर सोडणे आणि पोट आत
खेचणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होणे अपेक्षित आहे. सुरुवातीला ही
क्रिया 10 ते 15 वेळा करा. हळू हळू  60 पर्यंत ही क्रिया
वाढवू शकता. मधून मधून थोडी विश्रांती घेऊ शकता. या क्रियेमुळे
फुफ्फुसाच्या खालील भागातील हवा आणि कार्बन डाय ऑक्साईड बाहेर
निघेल. विज्ञानाने सिद्ध झाले आहे की कपालभातीने शरीरावरील अनावश्यक चरबी नष्ट होते.

श्वाससंबंधी आजार असणा-यांनी कपालभाती करू नये. कपालभाती केवळ
काम्या पोटीच करावे. अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली कपालभाती
केल्यास अधिक चांगले.

Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235.

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

मराठी सुविचार ( Marathi Quotes)

Sunrise over the south beach of Jamaica.
Sunrise over the south beach of Jamaica. (Photo credit: Wikipedia)
कालचा दिवस मला खूप काही शिकवून गेला हे खरं;
पण मी आज जे करेन त्यावर माझा उद्या आकाराला येईल,
हे मला समजलं आहे.
*********************

आजचा दिवस मी उमेदीने,हिमतीने,जिद्दीने आणि
मनापासून जगेन,कारण हा दिवस
माझ्या आयुष्यात पुन्हा कधी उगवणार नाही,
हे मला ठाऊक आहे.
*********************

आजचा दिवस ही माझ्या आयुष्याने मला दिलेली
शेवटची संधी असू शकेल.
उद्याचा सुर्योदय मी पाहीनच याची काय खात्री?
*********************

आज मी हरणार नाही. मागे पाहाणार नाही,
अश्रु ढाळणार नाही, एकही संधी हातची जाऊ देणार नाही.
आज मी माझ्या आयुष्यातल्या सर्वात मौल्यवान संपत्तीची
उत्तम गुंतवणूक करीन: वेळ
*********************

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,निदान एक
काम पुर्ण करीन,निदान एक अडथळा ओलांडीन,
निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
********************

आज मी चिडणार नाही,वैतागणार नाही, धुसफुसणार नाही.
मनावरचं निराशेचं मळभ हटवून आज मी प्रसन्न हसेन.
*********************

आज मी जमिनीवर पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीन.
आणि आकाशात नजर लावून तिथे
चमकणारी माझ्या स्वप्नाची नक्षत्रं डोळे भरून पाहीन.
***************************

आज निदान एवढं तरी मी करीनच.!
*****************************

-Mr. Yogesh Madhukar Sawant. 
Mob. 9221716915 / 9867627235

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

मराठी जोक ( Nice Faltu Jokes)

English: Recipon Leo Français : Recipon Leo
English: Recipon Leo Français : Recipon Leo (Photo credit: Wikipedia)

दोन छोटी मुलं बोलत उभी असतात.
पहिला: माझी आई सर्व्हिस करते...
दुसरा: माझी आई टेनीस खेळत नाही...
----------------------
एक दुधवाला दुध घेउन रस्त्याने जात असतो आणि अचानक तो दुध पिउन टाकतो... का??
कारण मागुन गाडी हॉर्न वाजवते, पी.पी..पी...पी !!
---------------------
पाल आणि मिथुन यांच्यात फरक काय?
.....
.....
मिथुन 'चक्रवरती'
आणि
पाल 'भिंतीवरती'
----------------------
एकदा दोन कॉफी मग्स डायनींग टेबल वर भेटतात तर एक मग दुसर्‍या मगाला काय म्हणेल
?
उत्तर: काय मग काय चाल्लय?
------------------------
मास्तर: बंड्या 'रस असणे' वाक्यात उपयोग करुन दाखव...
बंड्या: उसाचा रस काढणार्‍या माणसाला उसाचा रस काढण्यामधे फार रस होता....!!
------------------------
अलीबाबा गुहा शोधायला चालत निघतो,
चालुन चालुन खुपच दमतो,
चालता चालता
शेवटी एकदाची गुहा येते.
तर तो काय म्हणेल?
.
आली बाबा !!
------------------------
लालु पी.एम. बनतो. गावात फेमस व्हायला म्हशींबरोबर फोटो काढतो. दुसर्‍या
दिवशी पेपर मधे फ्रंट पेज वर तो फोटो येतो. खाली लिहिलेले असते, लालू,
डावीकडुन तिसरा!!
------------------------
जेव्हा सिंहाची गर्जना होते तेव्हा काय होते ?????
.
.
अरे
टॉम अँड जेरी सुरु होते ...
------------------------
एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात.
रिक्षेवाला म्हणतो, "इतके लोक रिक्षेत नाही मावणार.."
तर त्या मांजरी काय म्हणतील???
"माऊ माऊ"!!
------------------------
गुरुजी: बाळ बबन, खाली दिलेले अंक इंग्लिश मधे म्हणुन दाखव बघु....
"70, 82, 89, 99"
बबन: "शेवंती, येती तू ?... येत नाय? .. नाय त नाय!!!"
-----------------------
पहिला मुलगा: माझे बाबा एव्हढे उंच आहेत की ते चालत्या विमानाला हात लावतात....
दुसरा मुलगा: माझे बाबा पण खुप उंच आहेत पण ते असला मूर्खपणा करत नाहीत ....
-----------------------
जर बसंतीची मावशी ठाकूरला राखी बांधते तर बसंती आणि ठाकूर मधे नातं काय?
....
अरे विचार काय करताय? ठाकूरला हातच नव्हते


-- Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

प्रपोज केल्यानंतर .....

two birds
two birds (Photo credit: McBeth)
प्रपोज केल्यानंतर "मुलीकडून साधारणता" कोणती उत्तरे" मिळू शकतात त्याबद्दल
काही....

१. नाही sssssss

२. शी . किती घाणेरडे विचार आहेत तुझे ?

३. मी तर तुला ' तसल्या नजरेने' पाहिलेच नाही ... मी तुला फक्त एक चांगला
[ हे अजून वर ] दोस्त मानते ...

४. मी "ऑलरेडी एंगेज" आहे.

५. प्लीज, माझा असल्या "फालतू गोष्टींवर" विश्वास नाही. माझ्यासाठी माझे '
शिक्षण, करियर व कुटुंबिय' महत्त्वाचे आहेत....

६. आपली तर आत्ता कुठे चांगली ओळख झाली आहे, तु तर मला अजून व्यवस्थीत ओळखत
पण नाहीस, मला वाटतं की हे कदाचित "आकर्षण" असावे ...

७. तु किती कमावतोस ? / तुझा बॅलेंस किती आहे?

८. मागच्या वर्षीच तर मी तुला "राखी" बांधली होती !!!!

९. माझी अशा गोष्टींसाठी अजून 'मानसीक तयारी' झाली नाही ....

१०. मी माझ्या आईला / दादाला विचारून सांगते ....( बाबांपर्यंत नको ) { नंतर
काहीच नाही .....}

११. मुर्ख , एवढी छोटीसी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला येवढा उशिर करतात का ?

१२. मला माहित आहे. बोलुन दाखवण्याची गरज नाही ....

१३. सॉरी ....

१४. "आरश्यात तोंड बघ मेल्या ... म्हणे तू मला आवडतेस !!!"

१५. मी तर तुला भावासमान मानते [ पण मी मानत नाही ना !!! ]

१६. होय, मला पण तू आवडतोस , पण तू माझा विश्वासघात करणार नाहिस ना ?

१७. गाढवा, आधिच नाहीस का सांगायचं, आता वेळ निघून गेली [ म्हणजे दुसरे
कोणतेतरी चांगले "गाढव" सापडले ]

१८. तु जर थोडे आधी सांगितले असते तर मी कदाचित विचार केला असता ....

१९. नालायका , तुझी हिंम्मत कशी झाली मला असे विचारायची ?" [ त्यानंतर कदाचित
एक छानशी कानफाडीत ...]

२०. ती : मला विचार करायला वेळ हवा आहे ...
तो : नक्की किती ? [ अजून आशा आहे तर ....]
 ती : ७ जन्म .... [ यानंतर मुलगा बेशुद्ध ...]

२१. नीच माणसा, मी तर एक "विवाहित स्त्री" आहे तरीपण ....

२२. सॉरी , माझे तुझ्या मित्रावर / छोट्या भावावर प्रेम आहे ....

२३. हा हा....हा हा हा.... हा हा हा हा ही ही ... ही ही ही ... ही ही ही ही

२४. लग्नाच्या आधी माझा असल्या कुठल्याही फालतू गोष्टीत गुंतण्याचा विचार
नाही....

२५. मातीत जा ... मला त्याची पर्वा नाही ....

२६. तु माझ्यासाठी काय करू शकसिल ?

२७. मी कितवी आहे? हा हा हा ....

२८. मी तुझ्याबद्दल "तसला विचार' कधी केलाच नाही ...

२९. माझ्या भावाला भेट, तो तुला व्यवस्थित समजावून सांगेल....

३०. का ??? "स्वाती" नाही म्हणली का?

३१. पण तू तर "सपना च्या" मागे होतास , तिने काय थप्पड वगैरे मारली का ?

३२. किती दिवसांकरता ? सॉरी किती तासांकरता ?

३३. " जे काही बोलायचे आहे ते लवकर बोलुन टाक, माझ्या मुलाची शाळेतून
येण्याची वेळ झाली आहे..."

३४. कित्तीssss छान ....

३५. पुढच्या ४ महिन्यांची 'वेटिंग लिस्ट ' पन फुल्ल आहे ...

३६. क्काय sssss

३७. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा नाहितर ....

३८. मला वटतयं कदाचित मी "एंगेज" असेन ...

३९. मझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त चांगले "ऑप्शन" आहेत...

४०. मला ह्या गोष्टीबद्दल काहिएक बोलायची इच्छा नाही. त्यानंतर ती
त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागते .....

 ४१. माझ्या "बॉयफ्रेंडला" कळले तर

-- Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

आमचो मालवणी माणूस....

Sea turtle visits for lunch
Sea turtle visits for lunch (Photo credit: micahcraig)
आमचो मालवणी माणूस....

मालवणी मानसं प्रेमाची भुकेली
शाबासकीचो दोर घेऊन माडार चढतली,
चढता चढता मध्येच खाली पडतली,
तोंडार आपटली तरी हि हि करतली,
स्वतः भूखी रवतली,
पावन्यक जेवक घालातली,
कोकम मिश्याक लावतली,
तूप खालय म्हणान सांगतली,
हजार रुपयाची वस्तू धा रुपायक मागतली,
मिळाली नाय ती खराब म्हणान सांगतली,
गणपतीत जोरात आरती-भजन गातली,
शिमग्याक जोरात सोंगा नाचवतली,
दशावतारी नाटक बघित थयच पसारतली,
जत्रेचा खाजा चार दिस खातली,
मालवणी मानसा हि अशीच रवतली,
फसली गेली तरी नाय म्हनतली,
हसणाऱ्याक रडयतली, रडणाऱ्याक हसवतली,
गुणगान करता करता, मधीच गळीय घालतली,
असो आमचो मालवणी माणूस......

--- Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

मराठी सुविचार [ Marathi Quotes]

Flower alone
Flower alone (Photo credit: @Doug88888)
देखणेपणावर जाऊ नका,सौंदर्याला कोमेजण्याचा शाप असतो.

श्रीमंताला भुलू नका,आलेल्या पैशाला जाण्याच्या
वाटा पटकन सापडतात.

जी व्यक्ती तुमच्या चेहर्यावर हास्य फुलवू शकते,
तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते.

प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं,तरी तुमच्या
स्वप्नाचा ध्यास सोडू नका.

करावीशी वाटेल ती प्रत्येक गोष्ट करून पाहा.
जिथे जावंसं वाटेल,तिथे जा. आयुष्य एकदाच मिळतं आणि संधीही पुन्हापुन्हा
येत नसते.

आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून,
खोडून टाकत आहे, काल आणि उद्या.

-Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी