मराठी विनोद [ Marathi Jokes ]

Laughter is the magical impulse of life
Laughter is the magical impulse of life (Photo credit: symphony of love)
1) भिमाकाकू सिनेमा हॉल मधे पेप्सीची बाटली घेवुन गेल्या होत्या, थोड्या थोड्या
वेळाने घोट घेत होत्या,आवाज येत होता, त्यामुळे शेजारी बसलेल्या माणसाला राग
आला. त्याने बाटली हिसकावून घेतली आणि एका घोटात सगळी बाटली संपवली
माणूस : अस पितात कोल्डड्रिंक ..
भिमाकाकू : अरे बाळा पण मी कोल्डड्रिंक पीत नव्हते, पान खाऊन त्या बाटलीमधे
थ.कत होते.

2) दारू मुले आयुष्य उध्वस्त झालेल्या बेवड्याला बियर च्या बाटल्यांचा खच दिसला..
१ बाटली फोडून तो म्हणाला, तुज्यामुळे माझी बायको मला सोडून गेली...
२ बाटली फोडून तो म्हणाला, तुज्यामुळे माझा जॉब गेला...
३ री बाटली फोडण्यासाठी उचलली ती भरलेली होती, ती पिशवीत ठेवत तो म्हणाला,
तुझा काही दोष नाही, तू चल घरी...!

3) व्हॅक्युम क्लिनर सेल्समनचा जॉब लागल्यापासून संता उत्साहात होता,
भिमाकाकुंच्या घरात शिरला आणि ती काही बोलण्याच्या आतच खिशातुन एक पिशवी काढुन
त्यातले शेण जमिनीवर टाकल आणि म्हणाला : मॅडम ह्या व्हॅक्युम क्लिनरने हे
जमिनीवरचे शेण ५ मिनीटात साफ होईल नाही तर मी स्वत: ते खाऊन टाकेन.
भिमाकाकुं (उत्साहात) : तु ते शेण पावाबरोबर खाणार की चपातीबरोबर?
संता (दचकून) : का ?
भिमाकाकुं : कारण आता लाईट गेले आहेत..

4) एक कवी कविता ऐकवित होता. पण तो जसा कविता सांगायला सुरवात करीत असे त्याच्या
तोंडातली कवळी बाहेर यायची. असं बराच वेळ चालत राहालं.
शेवटी कंटाळून एक श्रोता म्हणाला, '' ओ महाशय काही कविता सांगता की नुसती
कॅसेटच बदलत राहाता.''

5) शाळेत मराठीचा क्लास चालू होता.
बाई : हे बघा मुलांनो , मराठी मध्ये प्रत्येक वाक्याचे २ अर्थ काढता येतात!!
दिघ्या : बाई काढून दाखवा ना !!!!!
बाई ( लाजुन ) : खाली बस वेडया ! तुझ्या या वाक्याचे देखील २ अर्थ निघतात!

6) Income tax officer हसत होता..
क्लार्क : काय झाल साहेब?
ऑफिसर : मल्लिका शेरावत ची फाईल आहे..
क्लार्क : मग? त्यात हसण्यासारख काय आहे?
ऑफिसर : कपडे तर घालत नाही आणि laundry bill दाखवलय ८ लाखाच..

7) पती : आपल्या बिल्डींग मधला राजू काय काय बडबडत होता..
पत्नी : काय म्हणत होता ?
पती : तो म्हणत होता. आपल्या बिल्डींगमधील एक बाई सोडून सगळ्या बायकांशी त्याच
लफड आहे म्हणून. कोण असेल ती एक बाई ?
पत्नी : देशपांडे आजी असतील.

8) कॉलेजचा पहिला दिवस, कॉलेजच्या कट्ट्यावरील काही टपोरी मुले चिंगीला अडवतात.
पहीला मुलगा : काय ग तुजे नाव काय आहे?
चिंगी : मला सर्वजण ताई बोलतात.
दुसरा मुलगा : कमाल आहे !!! काय योगा-योग आहे .. मला सर्वजण भाऊजी बोलतात...


Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या